“सत्ता ईव्हीएममधून येते, पण गडांवर हात ठेवला तर फोडून टाकू!” राज ठाकरे यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

0
6

दि.३१(पीसीबी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा गुरुवारी मुंबईत पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवरील कथित मतचोरी, सत्ताधाऱ्यांची चाटूगिरी आणि शिवरायांच्या गडांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटर वरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज ठाकरे यांनी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्याचं प्रात्यक्षिक सादर करत म्हटलं, “लोक म्हणतात माझ्या भाषणाला गर्दी होते पण मत मिळत नाही कारण मतं अशीच चोरली जातात. सत्ता ईव्हीएममधून येते आणि त्याच सत्तेचा गैरवापर करून गडकिल्ल्यांवरही हात ठेवला जातो.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी, रायगड, राजगडावर ‘नमो टुरिझम सेंटर’ उभारणार आहेत. हे पर्यटन नव्हे, ही आपल्या स्वाभिमानाची पायमल्ली आहे. सत्ता असो वा नसोगडावर असं काही उभं केलं, तर फोडून टाकणार!”असा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला आहे .

तुम्ही कितीही मतदान करा मॅच फिक्स आहे. मागे क्रिकेटमध्ये मॅच फिक्स झाल्यावर त्या प्लेअरला काढून टाकायचे इथे कोणाला काढत नाहीत. हे लोक असेच निवडून येतात, आणि त्यांना पाहिजे तसं वागतात, म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा. पण ते ऐकत नाहीत हे सगळं सत्तेतून येत आणि सत्तेतूनच मतांची चोरी होते, म्हणून 1 तारखेचा मोर्चा आहे. दिल्लीत समजलं पाहिजे काय आग पेटली आहे महाराष्ट्रमध्ये, महाराष्ट्रमध्ये असलेला राग या ठिकाणी दाखवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री व्हायचं म्हणून किती लाचारी करायची? वरच्या लोकांना कदाचित माहीतही नसेल की खाली किती चाटूगिरी चालू आहे. मुंबईतील जागा अदाणीला हव्यात? देऊन टाका सत्तेत बसलेल्यांना काहीही करण्याची सवय लागली आहे.”असं महंत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात आरोप केलाय.