सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटू नये – एकनाथ खडसे

0
275

जळगाव, दि. २४ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागतो यावर महाराष्ट्रातील आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांनी या चर्चांचं खंडन केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते”, असा एकनाथ खडसे म्हणाले.

“अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. आपण उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय?”, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. “एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.