सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार

0
271

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आज सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. सत्तासंघर्षावरील सुनावणी याचं आठवड्यात संपणार आहे. अशी माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ८ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे.

सुनावणी दरम्यान घटनापीठाने मोठी अपडेट दिली आहे. याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान केले. शिंदे गटाने परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा, असे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

येत्या गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडतील. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील तर त्यानंतर शेवटचे दोन तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील.