दि . १३ ( पीसीबी ) – विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे 9 डिसेंबर रोजी वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तपासात, वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघड झाले.
हत्येपूर्वी आरोपींनी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. सतीश वाघ यांचे मांजरी परिसरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल 14 तासांनी उरूळी कांचनच्या घाटात त्यांचा मृतदेह सापडला. मारेकऱ्यांनी अवघ्या 15 मिनिटात सतीश वाघ यांच्यावर चाकूने 72 वार केले आणि त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला. सतीश वाघ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर याच्याशी सतीश वाघ यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते आणि हेच या हत्येमागचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले.
9 डिसेंबरचा घटनाक्रम
9 डिसेंबरला सतीश वाघ शेवाळवाडीतून मॉर्निंग वॉकला (Morning Walk) निघाले. हॉटेल ब्लू बेरीजवळ थांबले असताना, चार जणांनी त्यांचे कारमध्ये अपहरण केले आणि सोलापूरच्या दिशेने निघाले. त्याच दिवशी संध्याकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.