सचिन वाझे आता माफिचा साक्षिदार, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या..

0
222

मुंबई, दि. १ (पीसीबी) : कथीत खंडणी प्रकरणात आता माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. यासाठी खुद्द वाझेनं मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच्या अर्जाला सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टानं मंजुरी दिली आहे. यामुळं मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सीबीआयच्या विशेष कोर्टात आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी पार पडली यावेळी सचिन वाझेला हजर करण्यात आलं होतं. यावेळी वाझेच्या अर्जाला मंजुरी देत त्याला माफीचा साक्षीदार घोषीत करण्यात आलं. यानंतर याता ७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला वाझेला प्रत्यक्ष कोर्टात हजर केलं जाणार आहे. यानंतर वाझेचा नियमित जामिनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

कथित खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांबद्दल आपल्याकडे असलेली माहिती देण्यास तयार असल्याचं वाझेनं म्हटलं आहे. यासाठी आपल्याला माफीचा साक्षीदार करावं असं त्यानं कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचा हा अर्ज विशेष सीबीआय कोर्टानं काही अटी-शर्तींसह मंजुरी दिली.