दि. १४ (पीसीबी) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपूडा बुधवारी झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. मुंबईतील प्रसीद्ध बिझनेसमनच्या नातीसोबत सचिनचा मुलगा विवाबंधनात अडकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकर याने एका खासगी सोहळ्यात सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला आहे. हा साखरपुड्याचा सोहळा बुधवारी पार पडला. या बातमीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबीयांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण आहे सचिनची होणारी सून?
सानिया चंडोक या मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमेरीचे मालक आहेत. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार सानिया चांडोक ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा साध्या पद्धतीने आणि खासगी करण्यात आला. त्यामुळे या सोहळ्याला दोन्ही बाजूंचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीतही फलंदाजी करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामने, 18 लिस्ट ए सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 532 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने लिस्ट ए मध्ये 102 धावा आणि 25 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 मध्ये अर्जुन तेंडुलकरने 119 धावा केल्या आहेत आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत.