मुंबई, दि. १८ (पीबीबी) – मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत बोलताना एक भविष्यवाणी केली. शिवसेना नेते सचिन अहिर लवकरच भाजपमध्ये दिसतील, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एवढंच नाहीतर विरोधकांची अवस्था अश्वत्थामा सारखी होणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलताना म्हणाले की, “आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान… यही भाजप की पहचान.” मुनगंटीवारांनी हे वाक्य उद्गारताच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसले. तसेच, मुनगंटीवारांच्या म्हणण्याला विरोधकांनीही दाद दिली. पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “परिवारही मेरी पहचान, असं भाजप काम करत नाही. बरोबर ना खडसे साहेब.”









































