सगळे उपाशी आहोत…

0
5

दि . २३ ( पीसीबी ) पिंपरी, – मंगळवारी पहेलगामला पोहचण्यापूर्वीच अतिरेकी हल्ल्याची खबर मिळाल्याने त्याच ठिकाणी निघालेल्या पुणे, पिंपरी चिंचवडच्या ३५ पर्यंटकांना लष्कराने हॉटेलवर थांबवल्याने सर्वजण सुखरूप आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्याने थांबत थांबत हे सर्वजण रात्री ११.३० च्या झेलम एक्सप्रेसने पुण्याकडे रवाणा होणार आहेत. शक्य झाल्यास या सर्वांनी विमानाने पुण्यात आणण्याची व्यवस्था केंद्रीयमंत्री मुरली मोहळ हे करणार असल्याचे समजले. दरम्यान, सर्व व्यवहार ठप्प असल्याने या जेष्ठ नागरिकांची दिवसभर उपासमार झाल्याचे अनेक पर्यटकांनी सांगितले.
रावेत, पिंपरी, भोसरी, औंध, चिंचवड, हडपसर, पुणे अशा सर्व भागातून कार्मिवल ट्रॅवल मार्फत हे ३५ जेष्ठ नागरिक कश्मिरच्या पर्यटनासाठी १३ एप्रिल रोजी गेले होते. कालचा अतिरेकी हल्ला होण्याच्या दरम्यान हे सर्वजण त्याच ठिकाणाकडे निघाले होते. हल्ल्याची खबर मिळताच या सर्वांनी लष्कराने थेट हॉटेलवर रवाना केले.
रावेतचे रहिवासी असलेले अनिरुध्द खान्नाडे म्हणाले, आम्ही पहेलगामला निघालोच होतो तोच अतिरेक्यांच्या हल्ल्याची बातमी समजली आणि आमचे तिकडे जाणे रद्द झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आम्हा सर्वांनी थेट हॉटेलमध्ये नेण्यात आले. जम्मूकडे जाणारा नवीन रस्ता बंद केला आणि रस्ते, घाट अनेक ठिकाणी बंद असल्याने येताना खूप अडचणी आल्या. सर्वांची उपासमार झाली. रात्री ११.३० ची झेलम एक्सप्रेस मिळणे कठीण दिसते मात्र, केंद्रीय मंत्री मोहळ यांनी सर्वांना विमानाने नेण्याची सोय करतो असे सांगितले आहे. आम्ही सुखरूप आहोत.
हडपसरचे शिंदे दत्तात्रेय म्हणाले, आम्ही कालपासून पहेलगाम मध्येच अडकलो होतो. आमच्या अगोदर दोन तास घटना घडली म्हणून आम्हाला थेट हॉटेलमध्ये नेले. सुखरूप परत येत आहोत.