सख्या भावाचे बनावट सही अंगठे करून जमिनीची विक्री

0
72

चाकण, दि. 22 (पीसीबी) –

सख्ख्या भावाचे बनावट सही आणि अंगठे करून जमिनीची विक्री केली. याप्रकरणी सख्या भावासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 डिसेंबर 2021 रोजी चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला.

आनंदा दामू भोसले (वय 60, रा. पाडळी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंदा उर्फ रामू भोसले (रा. पाडळी, ता. खेड), धीरज कुमार सुरेंद्र सेठिया (रा. चाकण), सुनील गणपत वाळुंज (रा. शिरोली, ता. खेड), दीपक कोंडीभाऊ पाबळे (रा. कडधे, ता. खेड) बनावट सही करणारा तोतया व्यक्ती, वकील रवींद्र कर्नावट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदा भोसले आणि गोविंदा भोसले हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी यांची वडीलोपार्जित जमीन पाडळी येथे आहे. त्यातील 41 गुंठे जमीन विक्रीसाठी साठेखत तयार करून कायदेशीर मान्यता देणार म्हणून फिर्यादी यांचे सही अंगठे आवश्यक होते. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्या ऐवजी दुसरा व्यक्ती उभा करून त्याचे बनावट सही आणि अंगठे घेऊन खरेदीखत केले. त्याद्वारे फेरफार केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.