दि . २५ ( पीसीबी ) मुंबई : मुंबईच्या जुहू परिसरात सख्ख्या बहिणीवर धारदार चाकूने वार करून तिची भावाने हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रक्ताच्या नात्याला कलंक लागला आहे. संपत्तीच्या वादातून आरोपीने हे भयंकर कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जुहू परिसरात भावाने संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीची हत्या केली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.अन्वया करंदीकर पैंजणकर असं हत्या झालेल्या 45 वर्षीय बहिणीचं नाव आहे तर आरोपी आशिष करंदीकर असं अटक केलेल्या 50 वर्षीय भावाचं नाव आहे. शुक्रवारी (25 एप्रिल )मयत अन्वया आणि आशिष यांच्यात संपत्तीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपींन किचनमधील धारदार चाकूने बहिणीवर हल्ला केला. या हल्ल्यात बहिणीचा जागीच मृत्यू झाला.रक्ताच्या थारोळ्यातच तिचा मृतदेह निपचित पडला.
दरम्यान वडिलांचे निधन झाल्यापासून आरोपी भाऊ आशिष आणि मयत बहीण अन्वया यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. शुक्रवारी त्यांच्यात संपत्तीवरून झालेला वादच बहिणीच्या अखेर जीवावर बेतला.
Home Maharashtra सख्ख्या बहिणीवरच भावाने धारदार चाकूने केले वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, मुंबईतील प्रकार