संस्कारची दिवाळी गडचिरोली येथील आदिवासींसोबत

0
364

पिंपरी दि. १६ (पीसीबी) – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गडचिरोली येथील जिमलगट्टा अहेरी भामरागड या परिसरातील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त कपडे साड्या साखर रवा मैदा तेल साबण आकाश कंदिल उटणे इ साहित्याचे वाटप केले जाते यावर्षी चिंचवड येथुन शनिवार दि.१५/१०/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी बसची पुजा करुन बसला हिरवा झेंडा दाखऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्रथम गाडीतील घेऊन चाललेल्या साहित्याची माहिती गाडीत जाऊन घेतली.

संस्था सोमवार दि.१७/१०/२२ रोजी आनंदवन सोबत दिवाळी साजरी करणार मंगळवार दि.१८/१०/२२ रोजी हेमलकसा सोबत दिवाळी साजरी करणार आणि बुधवार दि.१९/१०/२२ रोजी दिवसभर जिमलगट्टा येथील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणार आहेत ३००० आदिवासी बांधवांना वरील साहित्य वाटप करणार आहे १५०० साड्या,१००० पुरुष ड्रेस,५०० लहान मुलांची कपडे तसेच साखर रवा मैदा भिस्किट पुडे लाडु चिवडा तेल उटणे साबण बेसन पीठ तुरडाळ गुळ आकाश कंदिल अशा विविधा वस्तुंचे वाटप करणार आहे.

यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सागर कवडे सर आणि जिमलगट्टा विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षिरसागर यांनी सहकार्य केले.यांचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले या उपक्रमाची तयारी एक महिना अगोदर चालु केली होती फक्त फेसबुक आणि वॉटपच्या माध्यमातून जमा झालै