संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा याला अटक

0
214

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे.

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हाच असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. ललित झा यानेच 13 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती, असे चौकशीत समोर आले. ललित घुसखोरीनंतर राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलीस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला. पोलिसांनी त्यानंतर ललितला अटक केले.कर्तव्यपथ स्टेशनजवळ पोलिसांनी त्याला अडकवला.

प्रेक्षक गॅलरीतून ललितने केले शुटिंग गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, असं पोलीस तपासात आली आहे. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचं शुटींग ललितनेच केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते. घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असं पोलिसांनी म्हटलंय. ललित झाचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ आढळलंय. ललित झाचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जातेय. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.

घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षापूर्वीचं देशाच्या संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य अशी चूक घडली आणि काही जणांनी सभागृहात घुसखोरी केली. मात्र हा प्लान दीड ते दोन वर्षापूर्वी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी केल्याचं समजतं. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सगळ्यांची पहिली एकत्रित बैठक मनोरंजनच्या कर्नाटकातील मैसूरमधील घराजवळ झाली. इथेच बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवर सरकारला जागं करण्यासाठी काही तरी मोठं करण्याचा प्लॅन त्यांनी केला. 13 डिसेंबर तारीख निश्चित केल्यांनतर सर्व जण 10 तारखेपर्यंत दिल्लीला पोहोचले. तीन दिवस शर्माच्या घरी राहिल्यानंतर 13 तारखेला सकाळी सर्व जण संसद परिसराजवळ पोहोचले. फक्त दोन पास मिळाल्यामुळे मनोरंजन आणि सागर शर्मा संसदेच्या आत गेले आणि ही घटना घडवून आणली.