संशयावरून एकास मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

0
408

रहाटणी, दि. २८ (पीसीबी) – प्रेम प्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगितल्याचा संशयावरून प्रियकराने एकास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.

अतुल उल्हास आढाव (वय 26, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य अशोकराव उतकर (वय 20, रा. रहाटणी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याबाबत तरुणीच्या घरी समजले. याबाबत फिर्यादी यांनी तरुणीच्या घरी सांगितले असा आदित्यला संशय होता. त्यावरुन त्याने फिर्यादींसोबत वारंवार वाद घातला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी शिवराज नगर येथे चिकन आणण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना अडवले आणि मारहाण केली. लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.