संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी केला भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा निर्धार !

0
5

चिंचवड, दि. २४ – पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड मतदार संघातील रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दर्शविला होता. फक्त मेळावा घेणार असा निरोप भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवला आणि एखाद्या आमदारांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी तसाच जनसागर उसळला होता. त्याप्रमाणे आज रोजी बोलावलेल्या संवाद बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला या वेळी येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पिंपरी चिंचवड मधील चिंचवड मतदार संघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आहे चिंचवड मतदार संघातून अपक्ष उभे राहणारे भाऊसाहेब भोईर

२००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुक लढविली होती त्यावेळी त्यांना कॉंग्रेस पक्षाचे तिकीट होते परंतु त्यावेळी तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार दिवंगत लक्ष्मण जगताप विजयी झाले होते.

त्यानंतर मधल्या पंधरा वर्षांत त्यांनी अनेकदा चिंचवड चे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी पक्षाने त्यांना डावलले २०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराने कळस गाठला त्यामुळे विचलित होऊन २०२४ ची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार भाऊसाहेब भोईर यांनी केला असून त्याला आता जनतेची ही साथ मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी घेतलेला कार्यकर्ता मेळावा असो की दि. २४ ची संवाद बैठक अनेक प्रतिष्ठित लोक आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
यावेळी भाऊसाहेब भोईर यांच्या समवेत धनाजी येळकर- छावा मराठा युवा महासंघ, मा. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, नवयुग साहित्य मंडळाचे राज अहेरराव, बाळासाहेब मरळ, विनोद मालू व तसेच मदारसंघातील मोठ्या संख्येने सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.