संवादिनी कला सन्मान प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित रवींद्र काठोटी यांना प्रदान

0
302

पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सवात अजय पोहनकर यांच्या हस्ते गौरव

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड निगडी येथे पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ संवादिनी कला सन्मान विख्यात गायक डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित रवींद्र काठोटी बेंगलोर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये मानधन पुणेरी पगडी मानचिन्ह शेला श्रीफळ, असे होते.

यावेळी पंडित अजय पोहनकर यांनी हार्मोनियम वादक श्री संतोष घंटे यांची स्तुती केली. गुरूंचा सन्मान काय असतो व गुरुंबद्दलची निष्ठा कशी असावी याबद्दल त्यांनी सांगितले. आपल्याला आज अनुभव आला असे सांस्कृतिक कार्यक्रम होणे खूप गरजेचे आहे आणि प्रेक्षकांची दाद ही तितकीच महत्त्वाची आहे, असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

सतोष घंटे गेली कित्येक वर्ष कार्यरत आहेत. त्याची तळमळ पाहून मी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. यावेळी आप्पांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. आप्पांची पहाडी रागातील ध्वनिफीत सर्वांना यावेळी ऐकण्यात आली. तत्पूर्वी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी राग नंद गाऊन लोकांची दाद मिळवली. त्यांना तबलासाथ संतोष साळवे व हार्मोनियम सात उमेश परळी यांची लाभली. त्यानंतर कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती असलेले पंडित रवींद्र कटोरी यांचे हार्मोनियम सोलो वादन झाले. त्यावेळी त्यांनी राग तिलक कामोद आणि राग शिवरंजनी प्रस्तुत करून लोकांची वाहव्वा मिळवली. खूप सुंदर असा हार्मोनियमच्या माध्यमातून संवाद लोकांपर्यंत साधला. त्यांना तबला साथ विनायक गुरव आणि त्याच पद्धतीने पंडित रवींद्र कटोरी यांचे सुपुत्र तेजस काटोटी यांनीही त्यांना हार्मोनियमची साथ संगत केली .

प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री संतोष घंटे यांनी आणि राकेश श्रीवास्तव यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रूपाली पठारे यांनी उत्स्फूर्तरीत्या पार पाडले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री परमेश्वर कांबळे राकेश श्रीवास्तव, विजय कंदळे, अशोक शिंदे, वैभव टकले, दिविज टकले, मयुरी घंटे यांची मदत झाली.