भोसरी, दि.२४ (पीसीबी) -ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने संरक्षण दलातील अधिकाऱ्याची 74 लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी येथील 34 वर्षीय अधिकाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 मार्च ते 27 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे.
ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा अज्ञात इसम, टेलीग्राम 9063919476 वरून बोलणारी दिशा नाव धारक, टेलीग्राम नंबर 6009645004 वरुन बोलणारी स्वीनल नाव धारक, ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी कस्टमर केअर नंबर 6387129625 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्यांना एक लिंक पाठवली. त्यावर लॉग इन करण्यास सांगून ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी टास्क पोर्टल चालवत असल्याचे सांगितले. या टास्कमध्ये सहभाग घेऊन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष फिर्यादीस दाखवण्यात आले. फिर्यादीस टास्क पूर्ण करण्यास सांगून कोणत्या ना कोणत्या कारणावरून टास्क पूर्ण न झाल्याने गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी रकमेची मागणी केली जात. त्यानुसार आरोपींनी फिर्यादीकडून एकूण 74 लाख तीन हजार 449 रुपये घेतले. त्यानंतर त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.