संयमी, उच्चशिक्षित आणि मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावर अजित गव्हाणेंना पसंती

0
47

-भेटीगाठी, प्रचार दौरा, मेळाव्यातून नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

-प्रचाराच्या शेवटच्या रविवारी अजित गव्हाणेंकडून नागरिकांच्या गाठीभेटीवर भर

भोसरी, दि. १७ :
निवडणुकांची रणधुमाळी सोमवारी (दि.18) संपणार असून प्रचाराच्या शेवटच्या रविवारी महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. गेली 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले.स्थायी समिती अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी असताना कोणतेही दोन नंबरचे काम केले नाही. दोन नंबरच्या कामांना कोणाला प्रवृत्तही केले नाही. जे काही असेल ते नियमांना धरून करा असाच सल्ला सर्वांना दिला. त्यामुळे कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. आगामी काळात याच धारणेनुसार काम करणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
दरम्यान आम्हाला भोसरी मतदारसंघाचा विकास हवा आहे. संयमी, उच्चशिक्षित उमेदवार आम्ही निवडून देणार असल्याचा विश्वास देखील यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रविवारी मतदार संघातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. विविध सोसायटी, समाज मेळावे यांना उपस्थित राहून अजित गव्हाणे यांनी नागरिकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी (दि.18) संपणार असून प्रचाराच्या शेवटच्या रविवारी अजित गव्हाणे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यादरम्यान रविवारी सकाळी मोशी दिघीमध्ये 20 हून अधिक सोसायट्यांमध्ये अजित गव्हाणे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले गेले वीस वर्षे मी नगरसेवक म्हणून काम केले आहे .यादरम्यान मला पक्षाने स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. या संधीचे मी सोने केले. भोसरीतील उड्डाणपूल, कै. अंकुशराव लांडगे सभागृह, विविध रस्ते, पाण्याच्या टाक्या, ग्रेड सेपरेटर असे अनेक प्रकल्प केवळ भोसरी मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण शहरासाठी पूर्णत्वाला नेले. सध्याचे शहरातील विविध रस्ते हे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड आणि मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मंजूर केलेले आहेत. हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते. स्थायी समिती सारख्या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना कोणत्याही प्रलोभनाला मी बळी पडलो नाही. माझ्या कारकिर्दीला कुठलेही गालबोट लागलेली नाही. त्यामुळेच माझा इतरांनाही सल्ला असतो. जे काही करायचे ते नियमांना धरून असले पाहिजे. भोसरी मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन देखील अजित गव्हाणे यांनी केले. यावेळी नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. भोसरी मतदारसंघाचा विकास आम्हाला हवा आहे. शांत, संयमी, उच्चशिक्षित उमेदवार यावेळी निवडून देणार असल्याच्या भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान अजित गव्हाणे यांना ख्रिचन समाज, आरजेडी पक्षाने यांनी पाठिंबा जाहीर केला आहे

अजित गव्हाणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिघी येथे त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी शिवसेनेतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण एक दिलाने काम करत आहोत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जाज्वल स्वाभिमान भिनलेला आहे. कोणत्याही दडपशाहीला दबावाला ते बळी पडत नाहीत. त्यामुळे भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशा भावना यावेळी अजित गव्हाणे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान अजित गव्हाणे यांनी दिघी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेतले तसेच काकड आरतीमध्ये सहभाग घेतला.

संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित गव्हाणे यांनी आयोजकांना आगामी काळात समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. अनेक समाज घटकांमुळे शहराची वाढ होत असते. शहराच्या प्रगतीमध्ये प्रत्येक समाज घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

संभाजीनगर येथील पर्ल बँक्वेट हॉल येथे
मराठवाडा कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवव्याख्याते गणेश शिंदे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. अजित गव्हाणे यांनी नागरिकांशी संवाद साधताना मराठवाडा समाजाचे कौतुक केले. मराठवाड्यातील समाज बांधवांनी या शहरांमध्ये आपली एक वेगळी ओळख जपली आहे. परिवर्तनाच्या या संघर्षात या प्रत्येक समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे देखील गव्हाणे म्हणाले.