संमलैंगीक पुरुषांना मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका

0
307

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : “पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे, असा इशारा WHO ने दिला आहे.

समलैंगिक पुरुषांनी आपले सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करण्याचाही सल्ला WHO ने दिला आहे. डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस यांनि दिलेल्या माहितीनुसार मंकी पॉक्सची सुमारे 99% प्रकरणे पुरुषांमध्ये आहेत आणि त्यापैकी किमान 95% रुग्ण इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आहेत.

“समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांनी मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि वेगाने पसरणाऱ्या विषाणूचा प्रसार कमी होण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित ठेवावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.