संदीप वाघेरे युवा मंचातर्फे दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा

0
431

पिंपरी दि. २० (पीसीबी) – पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव सात थर लाऊन सई मांजरेकर, प्रार्थना बेहेरे, मालविका गायकवाड, राजेश्वरी खरात या सेलिब्रिटी समवेत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शितळादेवी मित्र मंडळ गोविंदा पथक चेंबूर यानी या वर्षी दही हंडी फोडण्याचा मान मिळवला.

कोविडमुळे साथीच्या आजारामुळे गेली 2 वर्षे आपण परंपरेने आलेले सण, उत्सव सार्वजनिक रित्या साजरे करू शकलो नाहीत. परंतु, यावर्षी त्याच उत्साहात व जल्लोषात हा श्रीकृष्ण भगवंताच्या जन्माचा दहीहंडी उत्सव साजरा करत आहोत याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत वाघेरे म्हणाले की, विकास म्हणजे आपल्या राहणीमानात सुधारणा, पर्यावरणाचा समतोल राखून शहराचा व पिंपरी गाव परिसराचा विकास पाच वर्षाच्या कालखंडात केला आहे. प्रभागात होणाऱ्या प्रत्येक विकासामध्ये सर्व समावेशक निर्णय घेण्यात आला होता व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणून तितकाच तत्परतेने त्याची अंमलबजावणी केली याचा मला अभिमान वाटतो आहे. मिलट्री डेअरी फार्म हद्दितील रेल्वे उड्डाणपूल सातत्याने पाठपुरावा करून तडीस नेला.

पिंपरीगांव ते पिंपळे सौदागर नदीवरील समांतर पूल,आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगणाचे काम सुरु केले आहे. छत्रपती संभाजी महाराज सृष्टीचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा फुले क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होत आले आहे. पिंपरी गावठाण,एच.बी ब्लॉक,सी ब्लॉक, मुख्य व अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून भिमनगर, बालामल चाळ ,पॉवर हाउस चौक ते पिंपळे सौदागर शंभर फुटी रोड, या रस्त्यांची कामांच्या निविदा निघून कामांचे आदेश निघाले आहेत.पिंपरी गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराची पुर्ण बांधनी माझ्या कार्यकाळात झाली याचा मला मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिहासनाधीष्ठीत पुतळा सुशोभिकरणाचे कामही पूर्ण केले याचा मला खुप आनंद आहे. गेली 40 वर्षे काही लोकांनी सत्तेत राहून विकास साधता आला नाही. तो, मी गेल्या 5 वर्षात करण्याचा प्रयत्न केला.

गाव परिसराचाच विकास डोक्यात न ठेवता शहर पातळीवर पवना,मुळा, इंद्रायणी या नद्या प्रदूषित होऊन गटार झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची व पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेवून मी ‘नदी सुधार योजना’ या महत्वकांक्षी प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला.त्यासाठी शेअर बॉंड काढण्याचे आवाहन आयुक्त यांना केले होते. मी पर्यावरण प्रेमी असल्यामुळे मिलट्री डेअरी फार्म येथे गेली 5 वर्षे सुमारे 30 हजार वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी घेतली आहे.

कार्यक्रमास माजी महापौर नितीन काळजे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, ह.भ.प.माऊली महाराज वाळूंजकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, सुभाष वाघेरे, तानाजी वाघेरे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, सुरेश शिंदे, अनंत रणदिवे, निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे, डॉ.विनायक पाटील, सुनील बागवानी, सुनिल आहिरे, राजेश जगताप, जयवंत रोकडे, सचिन मगर, निलेश दाते, अमोल उंडे, गणेश ढाकणे, संदीप कापसे, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कश्यता भाटीया,पवन भोजवानी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, नितीन गव्हाणे, उमेश खंदारे,राजेंद्र वाघेरे,सचिन वाघेरे ,विठ्ठल जाधव,श्रीकांत वाघेरे,मयूर कचरे, अमोल गव्हाणे,रजना जाधव,अश्विनी लोहार ,अपूर्वा खोचाडे आदींनी परिश्रम घेतले.