पिंपरी, दि. २६(पीसीबी) – माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेमध्ये करण्यात आलेले आहे तसेच सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास पुणे जिल्हयातील अनेक धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला असून अनेक गरीब गरजू रुग्णांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
शिबिरामध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार प्रत्यारोपण,कॉकलर इंप्लांट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार,हिप प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया व केमोथेरेपी,प्लास्टिक सर्जरी, दंतरोग नेत्ररोग,नेत्ररोग,बालरोग व शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया,आयुर्वेदिक उपचार मूत्र मार्गाचे विकार,मूत्र मार्गाचे विकार,त्वचा विकार,फाटलेली टाळूव ओठांवरील शस्त्रक्रिया,बॉडी चेकअप,एपिलीप्सी, फिट येणे, होमियोपथी,कान नाक घसा,अनियमित रक्तदाब,मधुमेह,किशोरवयीन मुलींचे समुपदेशन,गरोदर मातांची तपासणी /लहान मुलांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया,मोफत एन्जिओग्राफी,आयुर्वेदिक या आजारांवरती मोफत तपासणी व उपचार होणार आहे.
औषधोपचार किंवा शस्त्रकिया करण्यासाठी या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिरामध्ये सहभाग घेण्यासाठी श्री. अमित कुदळे (९६७३४९४१४९), श्री. राजेंद्र वाघेरे(९९२२८६३८९३), सौ. रंजना जाधव(९७६६४८७२३६),श्री. हनुमंत वाघेरे (९६५७७४८५०५) यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे स्थळ :- श्री संदीप भाऊ बाळकृष्ण वाघेरे जनसंपर्क कार्यालय, शिवराज्य चौक, पिंपरीगाव, पुणे – ४११०१७