संत सियाराम बाबा यांचे निधन

0
48

भोपाळ, दि.11 (पीसीबी) – नर्मदा माता व श्री हनुमानाचे परम भक्त संत सियाराम बाबा यांचे आज (बुधवारी) मोक्षदा एकादशीच्या पवित्र दिवशी, सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मध्य प्रदेशात खरगोन येथे महानिर्वाण झाले. बाबाजींना त्यांची गहन साधना आणि समाजसेवेच्या कार्यासाठी ओळखले जायचे. देशभरात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. बारा वर्षे त्यांनी मौन धारण केले होते. भक्तांकडून फक्त १० रुपये दान घेत असतं. अनेक चमत्कार त्यांच्या नावे सांगितले जातात. अत्यंत विरक्त जीवन जगलेले बाबा आयुष्यभर फक्त लंगोटवर होते.

गुजराथ मधील भावनगर येथे १९३३ मध्ये बाबांचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि सन्यास घेतला.
सियाराम बाबाजींच्या पार्थिव देहाचे अंतिम संस्कार नर्मदा किनारी, तेली भट्टयान, जिल्हा खरगोन येथे करण्यात येणार आहे. या प्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, अनेक मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बाबाजींचे जीवन नर्मदा मातेच्या भक्ती व सेवेसाठी पूर्णपणे समर्पित होते. त्यांच्या महानिर्वाणामुळे संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे.