संत निरंकारी मिशन करणार ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

0
473

पुणे, दि. ११ (पीसीबी) – निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे – ‘प्रदूषण आतील असो वा बाहेरील दोन्ही हानीकारक आहेत’ हे दिव्य उद्गार निरंकारी मिशनकडून मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व धर्मार्थ उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी एक प्रेरणास्रोत म्हणून उपयोगात आणले जात आहेत. या कल्याणकारी उपक्रमांमध्ये बहुधा वृक्षारोपण मोहीम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, जलसंधारण प्रकल्प, पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता मोहीम इत्यादींचा समावेश होतो. मानवतेला वाहिलेल्या निरंकारी मिशनच्या या सर्व सेवा सद्गुरु माताजींच्या मार्गदर्शनाखाली भक्तांकडून निरंतर निभावल्या जात आहेत.

सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने, समाजकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन ऑगस्ट २०२१ मध्ये संत निरंकारी मिशनने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ‘वननेस वन’ नावाचा स्तुत्य प्रकल्प सुरू केला. वृक्ष समूह रोपण करणे आणि त्यांची देखभाल करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण भारत देशामध्ये सुमारे ३१७ ठिकाणी १.३० लाख रोपांची लागवड करण्यात आली.

संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, ‘वननेस वन’ प्रकल्पाचा दुसरा टप्पा २०२२ मध्येही राबविण्यात आला ज्याअंतर्गत ३१७ वरून ४०३ ठिकाणी लागवड झाली असून १.६५ लाख रोपांची लागवड झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या या मालिकेअंतर्गत, संत निरंकारी मिशन, सतगुरु माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने, ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात होत आहे , ज्या अंतर्गत भारतभरात ५०० हून अधिक ठिकाणी रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजेपासून ‘वृक्षारोपण मोहीम’ आयोजित करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये खुटबाव (दौंड),भवरापूर ,कोरेगाव मुळ ,कामशेत ,पाषाण या ठिकाणी मागील दोन टप्यामध्ये ४५००० झाडे लावण्यात आली असून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये २५००० रोपांची लागवड करण्याचा संकल्प आहे अशी माहिती पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली.

आज पृथ्वीला ग्लोबल वार्मिंगची समस्या भेडसावत असताना वृक्ष लागवडीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. २०२० सालापासून, कोरोना संकटाने आपल्या सर्वांना निसर्गाची अमूल्य देणगी, प्राण वायू म्हणजे ऑक्सिजनचे महत्त्व समजावून सांगितले. यासोबतच त्याच्या कमतरतेमुळे होणार्‍या सर्व दुष्परिणामांचीही आम्हाला चांगली जाणीव करून देण्यात आली. ज्ञात असावे, की मनुष्याचे जीवन प्राणवायू वर आधारित असून हा प्राणवायू आपल्याला वृक्षांपासून प्राप्त होत असतो. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्यच नाही तर आपल्या जीवनासाठीही महत्त्वाचे आहे.

निरंकारी मिशनच्या अशा कल्याणकारी योजना ‘पर्यावरण संरक्षण’ आणि पृथ्वीच्या सुशोभीकरणासाठी एक कौतुकस्पद आणि स्तुत्य पाऊल आहे, ज्याचा अवलंब करून पृथ्वी अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ होऊ शकते