संत निरंकारी मिशनद्वारा वाल्हेकरवाडी येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन….

0
182

वाल्हेकरवाडी, दि. १५ (पीसीबी) – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील पिंपरी सेक्टर अंतर्गत वाल्हेकरवाडी ब्रांच येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, वाल्हेकरवाडी या ठिकाणी रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत करण्यात आले आहे.
बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशन चे श्री. रामचंद्र लाड (ब्रँच मुखी वाल्हेकरवाडी) यांनी केले आहे.