संत नामदेवमहाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न

0
71


पिंपरी,दि. १३ – पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी विश्वसंत श्री संत शिरोमणी नामदेवमहाराज यांचा ७५४ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री संत नामदेवमहाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, सर्व्हे नंबर, १३/१, प्लॉट नंबर २१, श्री संत नामदेव चौक, साठे मळा, वाल्हेकरवाडी मार्ग, चिंचवड येथे सकाळी ठीक ०८:०० वाजेपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या सोहळ्यात नारायण गाडेकर आणि रेखा गाडेकर या दांपत्याच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल – रुक्मिणी आणि नामदेवमहाराज यांच्या मूर्तींचे अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते, कार्याध्यक्ष अनिल पोरे, प्रकाश सुपेकर, दत्तात्रय सुपेकर, महेश मिरजकर, रामदास पिसे, पुरुषोत्तम खर्डे, श्याम खर्डे, नितिन हिरवे, मनोहर मुळे, मारुती मुळे, औदुंबर बगाडे, अशोक बाचल, विश्वंभर काकडे, सोमनाथ पतंगे आणि समाजबांधव यांची उपस्थिती होती. पूजनानंतर सामुदायिक भजनाने आणि सात्त्विक फराळाचा आस्वाद घेऊन पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.