” संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी ” या विशेषांकाचे प्रकाशन

0
518

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – डॉ. श्रीरंग गायकवाड संपादित ज्ञानबा तुकाराम या वर्षिकाचा ” संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी ” या विशेषांकाचे प्रकाशन आज डॉ. सदानंद मोरे ( अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी संत तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा लेखक आणि प्रमुख टाळकरी संत संताजी जगनाडे महाराज संस्थान यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
या प्रसंगी ह. भ. प. माणिक महाराज मोरे ( विश्वस्त , देहू संस्थान) , ह.भ. प. निलेश महाराज कबीर ( आळंदी), मा. मंदार फणसे ( संपादक , टाइम्स नाऊ) , मा. महेश म्हात्रे (जेष्ठ पत्रकार), मा. आ. प्रकाश देवळे (अध्यक्ष, साईबाबा ट्रस्ट शिरगाव) आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते.