संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडीच्या भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा; सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोरांची मागणी

0
379

निगडी, दि. २३ (पीसीबी) – भक्ती शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू असून त्या ठिकाणी काही समाजकंटक ह्यांनी भुयारी मार्ग काम बंद पाडले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना ईमेल करुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निगडी भागातील नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत होती त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी निगडी गावठाण ते निगडी एस बी आय बँक ह्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू केले होते त्या ठिकाणी काही समाजकंटक ह्यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून काम बंद केले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी गावठाण येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली आहे.

मुंबई पुणे महामार्गावर निगडी गावठाण येथील रस्ता अरुंद असून भुयारी मार्ग काम सुरू असल्याने निगडी गावठाण ह्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होणार पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी दिनांक १२ /६/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.