संत तुकाराम नगर मध्ये स्वातंत्र्याचा अमृतोस्तव व श्रावण सोमवार विशेष रुद्रपुजा

0
317

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – आर्ट ऑफ लिव्हिंग – वेदिक धर्म संस्थान संस्थेचे संत तुकाराम नगर येथील केंद्र द्वारे संत तुकाराम महाराज मंदिर येथे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वातंत्र्याचा अमृतोस्तव व श्रावण सोमवार विशेष रुद्रपुजा आयोजित करण्यात आली. सुमारे ६५० भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात गहन ध्यानाचा अनुभव घेतला.

समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आणि नकारात्मकता व त्यामुळे होणारे रोग, नैराश्य, दुःख निघून जाऊन सर्वत्र शांती, आनंद, प्रसन्न वातावरण पसरावे ह्यासाठी ही बहुमूल्य अशी श्रावण विशेष रूद्रपुजा आयोजित केली गेली. आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा उपक्रमां चे फोटो प्रदर्शन सजावट सर्वांना आवडले. सर्वांचे ह्या उत्सवाचे अनुभव खूप अनमोल अद्भुत होते. सर्व आनंदाने भारावून गेले होते.

बँगलोर आश्रम वरून आलेले स्वामी विश्वंभर जी व वेद पंडित याच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला. कलाकार गणेश भुजबळ, ओंकार डागमाळी, ललित वाघ, ऋषिकेश सुपेकर ह्यांनी भक्तिगीते व वाद्य तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले.
ह्या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन तेजश्री कपोते, सचिन नाईक, कल्याणी फाळके, अमेय जोशी, रवी सकाटे, शुभम माळी, रामकृष्ण कांगुने, महेश बिडकर, राजेश्वरी गवलिकर, धनश्री गवलीकर, अभिमन्यू फाळके, जयश्री राऊत, अथर्व धाळपे, संदेश शहा, शंकर सोनार, उर्मिला सोनार, गुरुनाथ सुतार, पूजा सुतार, ऐश्वर्या मुलगे, शशांक देसाई, श्रीधर कुलकर्णी, योगिता धाळपे, गणेश धाळपे ह्यांनी १५ दिवस सतत अहोरात्र परिश्रम घेऊन केले.
सर्व स्वयंसेवकांनी सर्वाना २८ ऑगस्ट ला संत तुकाराम नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग स्त्तवा स्टोअर ऐंजल इंटरप्राईजेस येथे होणाऱ्या नाडी परीक्षा साठी ही यावे हे आवाहन केले आहे.
दर वर्षीप्रमाणे हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर संस्था, आर्ट ऑफ लव्हिंगचे सर्व भाविक, स्थानिक लोकांबरोबर, आपले दीनानाथ जोशी, गीता जोशी, राजेश पिल्ले, अमित भोसले, वर्षा जगताप ह्याचे आर्थिक मोठे योगदान ही लाभले.
तसेच पिंपरी चिंचवड पोलिस ह्यांचे ही खूप धन्यवाद! त्यांच्या बंदोबस्त मदतीने हा कार्यक्रम खूप चांगला झाला.