संत तुकाराम नगर मध्ये श्रावण सोमवार व जन्माअष्टमी विशेष रुद्रपुजा

0
113

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : आर्ट ऑफ लिव्हिंग – वेदिक धर्म संस्थान संस्थेचे संत तुकाराम नगर येथील केंद्र द्वारे संत तुकाराम महाराज मंदिर येथे २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्रावण सोमवार व जन्माअष्टमी विशेष रुद्रपुजा आयोजित करण्यात आली. सुमारे ७०० हुन अधिक पुणे, पिंपरी चिंचवड मधून आलेल्या सर्व भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात गहन ध्यानाचा अनुभव घेतला.
समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, नैराश्य घालवून सकारात्मक ऊर्जा प्रस्तापित करणाऱ्या साठी ह्या विशेष रुद्रपुजा चे आयोजन केले गेले.
आर्ट ऑफ लिव्हिंग बँगलोर आश्रम वरून आलेले ऋषि देवरत जी व वेद पंडित मिथीलेश मिश्रा व कौशलेश मिश्रा यांच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला.
शेवटी ऋषि जी नी सर्वांना सेवाकार्या चे ही महत्व पटवून दिले.
सत्संग कलाकार अंबर पोकळे व संजना चिस्के, विशाल देसाई ह्यांनी भजन भक्तिगीते व वाद्य तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले.

सर्वांचे ह्या उत्सवाचे अनुभव खूप अनमोल अद्भुत होते. सर्व आनंदाने भारावून गेले होते व महाप्रसाद चा ही आस्वाद घेतला.

ह्या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन रवी सकाटे, अमेय जोशी, सचिन नाईक, स्मिता दळवी, प्रतिमा नाईक, कल्याणी फाळके, अभिमन्यू फाळके, गणेश धाळपे, योगिता धाळपे, संतोषी कांबळे, जितेंद्र कांबळे, शशांक देसाई, श्रीधर कुलकर्णी,अश्विनी कुलकर्णी, तेजश्री कपोते, वर्षा पवार ह्यांनी १५ दिवस सतत अहोरात्र परिश्रम घेऊन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग वेदिक धर्म संस्थान संस्थेचे महाराष्ट्र राज्य चे समन्वयक श्रेयांश चौधरी व अक्षय दलाल आणि पिंपरी चिंचवड समन्वयक राजेंद्र गायकवाड ह्याचे ही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्यांनी हा श्रावण भर रोज सर्वत्र पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये रूद्र पूजा आयोजित केल्या आहेत.
व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक राज्य समन्वयक माणिक भोंग व पिंपरी चिंवडमधील लेण्याद्री प्रशिक्षक गट प्रमुख शुभांगी गिरमे जी वेळ काढून उपस्थित राहिले.
आर्ट ऑफ लिव्हिंग चे मरकळ येथील त्रिवेणी आश्रम मधून आलेल्या पंचकर्म केंद्र चे डॉक्टरांनी ही तिथे कित्येक भाविकांची चिकिस्त्ता केली.

दर वर्षीप्रमाणे हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर संस्था व आपले समाज सेवक दीनानाथ जोशी, सतीश लांडगे ह्याचे मोठे मोलाचे योगदान ही लाभले.