संत तुकाराम नगर मध्ये घरफोडी करून चांदीचे दागिने पळवले

0
148

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी मधील संत तुकाराम नगर येथे अज्ञातांनी घरफोडी करून घरातून 25 हजारांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत घडली.

मयूर दत्तात्रय कांबळे (वय 37, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 25 हजारांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.