संत तुकाराम नगर मध्ये अधिक श्रावण सोमवार व शिवरात्री विशेष रुद्रपुजा

0
524

पिंपरी,दि.१७(पीसीबी) – आर्ट ऑफ लिव्हिंग – वेदिक धर्म संस्थान संस्थेचे संत तुकाराम नगर येथील केंद्र द्वारे संत तुकाराम महाराज मंदिर येथे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी अधिक श्रावण सोमवार व शिवरात्री विशेष रुद्रपुजा आयोजित करण्यात आली. सुमारे ६५० हुन अधिक भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात गहन ध्यानाचा अनुभव घेतला.

समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आणि नकारात्मकता व त्यामुळे होणारे रोग, नैराश्य, दुःख निघून जाऊन सर्वत्र शांती, आनंद, प्रसन्न वातावरण पसरावे ह्यासाठी ही बहुमूल्य अशी विशेष रूद्रपुजा आयोजित केली गेली. आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम वरून आलेले स्वामी प्रणवानंद जी व वेद पंडित श्रिजित बाले याच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला. सत्संग कलाकार भूषण मल्लू व शिवानंद वैरागकर ह्यांनी भजन भक्तिगीते व वाद्य तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले.

सर्वांचे ह्या उत्सवाचे अनुभव खूप अनमोल अद्भुत होते. सर्व आनंदाने भारावून गेले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा उपक्रमां चे फोटो प्रदर्शन सजावट सर्वांना आवडले.

ह्या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन अमेय जोशी, रवी सकाटे, सचिन नाईक, संतोषी कांबळे, जितेंद्र कांबळे, कल्याणी फाळके, विष्णु बढे, राणी रोडे, अनिकेत जाधव, अभिमन्यू फाळके, शुभम माळी, ओम फाळके, ऋतुजा कांबळे, अजिंक्य कांबळे, अवंती फाळके, राजेश्वरी गवलिकर, कुसुम तिवारी, योगिता धाळपे,अथर्व धाळपे, गणेश धाळपे, शशांक देसाई, पल्लवी जाट, गुरुनाथ, पूजा ह्यांनी १२ दिवस सतत अहोरात्र परिश्रम घेऊन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग वेदिक धर्म संस्थान संस्थेचे पिंपरी चिंचवड चे समन्वयक श्रेयांश चौधरी ह्याचे ही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्यांनी हा श्रावण भर सर्वत्र होणाऱ्या रूद्र पूजा साठी ही सर्वांना आमंत्रण दिले आहे.

व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक राज्य समन्वयक दीपक केसकर जी वेळ काढून उपस्थित राहिले. सर्व स्वयंसेवकांनी सर्वाना २० ऑगस्ट ला संत तुकाराम नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग सत्त्वा स्टोअर ऐंजल इंटरप्राईजेस येथे होणाऱ्या आयुर्वेद नाडी परीक्षा साठी ही यावे हे आवाहन केले आहे.

दर वर्षीप्रमाणे हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर संस्था व नंदू कदम तसेच आपले समाज सेवक दीनानाथ जोशी, गीता जोशी ह्याचे आर्थिक मोठे मोलाचे योगदान ही लाभले आणि आर्ट ऑफ लव्हिंगचे सर्व भाविक, स्थानिक लोकांचे सहकार्याने ह्या रूद्रपूजे चा सर्वांना खूप चांगला अनुभव घेता आला.