दि .7 (पीसीबी) – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरु आहे. या प्रकरणी सीआयडीला आणि एसआयटीला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळालाय. यामुळे आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झालीये.
काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडीओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. मात्र हे व्हिडीओ एसआयटींनी रिकव्हर केले आहेत.
महत्वाचा पुरावा हाती?
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ एसआयटीने मोबाईलमधून डिलीट केलेला. मात्र पोलिसांनी हा डाटा मिळवला आहे. एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केलेत.
संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे, तो न्यायालयात सादर केला आहे. मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहेत. तसेच लोखंडी रॉड आणि कोयता एसआयटीने न्यायालयात सादर केला आहे.
वापरलेली शस्त्रं जप्त-
वाल्मिक कराड फरार होताना आणि शरण येताना वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे, अशी माहिती सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. सुदर्शन घुले आणि विष्णु चाटे यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांनी विष्णू चाटेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्रं जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली आहेत. त्यात 41 इंचाचा गॅस पाईप, लोखंडी रॉड, पाच वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखे शस्त्र, एक कोयता, एक लोखंडी फायटर असे पोलिसांनी जप्त केल्याचे माहिती मिळत आहे.