संतोष देशमुख प्रकरणाला फूलस्टॉप द्या…

0
4

दि . १० ( पीसीबी ) – देवेंद्र फडणवीसांनी फुल स्टॉप दिलाय,यंत्रणेला थांबायला सांगितलं: मनोज जरांगे
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असूनही त्यांना सहआरोपी केले जात नाही. या विषयाला फुल स्टॉप द्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना गुप्त आदेश असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. इतक्या निर्घृणपणे हत्या घडवून आणणाऱ्या राजकीय गुंड मित्राला वाचवत असल्याची टीका त्यांनी पुन्हा एकदा केली .धनंजय मुंडे विषारी साप आहे .हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे .त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे .असेही मनोज जरांगे म्हणाले .

‘धनंजय मुंडेंसाठी नंबर एकचा आरोपी काम करत होता . त्यांच्या सरकारी बंगल्यावर तशा बैठका झाल्या आहेत .पहिली बैठक त्यांच्या एका कार्यालयावर झाली .त्यामुळे 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायला हवं .फरार आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले आहेत .खंडणी मागितल्यानंतर आणि खून झाल्यानंतरसुद्धा हे फोन झाले आहेत .पहिला आरोपी फोन उचलत नव्हता म्हणून इतर आरोपींनी धनंजय मुंडे यांच्याच कानावर फोन करून घातलं आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे .धनंजय मुंडे 302 मध्ये येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फुलस्टॉप दिलेला आहे .फडणवीस स्थानिक पोलिसांना सिग्नल देत नाहीत म्हणून धनंजय मुंडे वाचलेत .धनंजय मुंडे विषारी साप आहे .हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे .त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे .’असेही मनोज जरांगे म्हणाले .

‘कार्यालयात आरोपींची केलेल्या पहिल्या बैठकीत खंडणी मागायला जा नाही ऐकलं तर खून करा अशीच बैठक झाली होती .चालवत होता आणि तिथूनच एक नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे च्या वतीने करत होता .दुसरी बैठक कोणत्यातरी हॉटेलमध्ये झाली .आणि त्यानंतर खून झाला .पहिल्यांदा धनंजय मुंडेंवर 120 ब लागला पाहिजे . खूनाचा कट रचला आहे, हे तर सिद्ध झालंय .तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुल स्टॉप दिलाय .यंत्रणेला थांबायला सांगितलं .त्यामुळे तपास यंत्रणा हतबल आहे .फडणवीसांनी गुंड वाचवू नये .ही सर कारची बनवाबनवी सुरू आहे. फडणवीस जाणीवपूर्वक वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. धंनजय मुंडे यांच्या कार्यालयातून खंडणी मागितली जात होती. आता सगळं बाहेर येऊ लागलं आहे. धंनजय मुंडे खुनात असल्याचे पुरावे असून फडणवीस त्याला आरोपी होऊ देत नाही. मुंडे सरकारी बंगल्यावर खंडणी बैठक झाली, मुंडे देखील उपस्थित होते, फडणवीस यांच्याकडे सर्व पुरावे असतांना त्याला आरोपी होऊ देत नाही, राजकीय मित्र फडणवीस वाचवत आहे.’ अशी टीका जरांगेंनी केली.