पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : पतीसमोर पतीच्या संमतीने सासरा सुनेवर लैंगिक अत्याचार करत असे. त्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे उघडकीस आला आहे. सुनेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल बनवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. यासाठी विवाहितेने विरोध केला असता तिला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले.
पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तिचे कुटुंब भोसरी येथे वास्तव्यास होते. दरम्यान मागील दोन वर्षांपासून तिचा सासरा तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. यासाठी महिलेच्या पतीची देखील संमती असे. त्यानंतर पती आणि सासऱ्याने मिळून महिलेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल तयार केले. तिथून वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यास पती आणि सासऱ्याने प्रवृत्त केले.
महिलेने देह विक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिला असता पती आणि सासऱ्याने तिला अमानुषपणे मारहाण केली. तर तिला मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले. आता ती महिला बेघर झाली आहे. महिलेने मुंबई मध्ये टिळक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.