चिंचवड, दि . 22 – संताजी सेवा प्रतिष्ठानतर्फे
विद्यार्थी गुणगौरव आणि संताजी सेवा तेली समाजभूषण पुरस्कार वितरण नुकतेच पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात संपन्न झाले.
याप्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप, उपजिल्हाधिकारी, अनिल कारंडे , प्रज्ञा मोहिते , महेश गवई तसेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर , उद्योजक विष्णुपंत डेंगाळे, वैशाली आतकर उपस्थित होते.
आमदार शंकर भाऊ जगताप यांनी सर्व पुरस्कार प्राप्त समाजबांधवांचे अभिनंदन केले आणि समाजाला पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अविनाश चिलेकर यांनी विद्यार्थ्यांनी करियर निवडताना कृत्रिम बुद्धिमत्ता हेच उद्याचे संधीचे मोठे क्षेत्र आहे. नवीन उपयुक्त अभ्यासक्रम निवडावेत तसेच पालकांनी योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
बार्टी च्या ऑफिस सुप्रिडेंट प्रज्ञा मोहिते यांनी शासकीय योजना बद्दल माहिती दिली आणि सर्वांचे अभिनंदन केले
मा श्री सुधाकर लोखंडे उपक्रम प्रमुख यांनी संस्थेच्या वतीने आयोजित वधूवर मेळावा या बद्दल माहिती दिली
डॉ सरोज गणेश अंबिके अध्यक्ष संताजी सेवा प्रतिष्ठान यांनी समाज कार्य करताना विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आणि नवीन पिढी आणि जुनी पिढी याची सांगड घालून काम केले पाहिजे असे सुचवले
यानंतर संताजी सेवा प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त समाज बांधव
१)मा.श्रीमती रेखाताई डिंगोरकर(सामाजिक)
२)मा.श्री.अविनाश चिलेकर(पत्रकारिता )
३)मा.श्रीमती.राजश्री ताई चिलेकर (उद्योजक)
४)मा.श्री.रामभाऊ पिसे सर (सामाजिक)
५) मा. श्री.नितीन भाऊ पांडुरंग जगनाडे (सामाजिक)
६)मा.श्री. गोविंद भाऊ चौधरी (सामाजिक)
७)मा.श्री.ह.भ.प. विश्वासराव डोंगरे (अध्यात्मिक )
८)मा.श्री. गजानन नाना सायकर(सामाजिक)
९)मा.श्री.नितीन बन्सी राऊत (उद्योजक) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तसेच ७० विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात आले
पिंपरी चिंचवडमधील सर्व तेली समाज बांधव तसेच तेली समाज विद्यार्थी मित्र, संताजी सेवा तेली समाजभूषण पुरस्कार विजेते सन्माननीय समाजबांधव, सर्व सरकारी अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, मोरया पेरामेडिकल इन्स्टिट्यूट चिंचवडचे प्रशिक्षणार्थी इ सर्वांनी उपस्थिती होती
या नंतर मा प्रदीप सायकर यांनी आभार मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा डॉ गणेश मा अंबिके मा राजाराम वंजारी मा मनोज आणेकर मा श्री सुनील देशमाने मा श्री अमोल देशमाने सौ जिजा राजाराम वंजारी मा रोहिदास पडगळ यांनी विशेष कार्य केले.














































