संजोग वाघेरे प्रचारासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची आज प्रचार सभा

0
146

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा बुधवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार मतदार नागरिकांना संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी. पी. आय. (एम),आर. पी. आय. (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये उपस्थित राहणार आहेत