संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो

0
397

मुंबई,दि.३०(पीसीबी) -शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे. आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी बॅनर शहरात लावले आहेत. या बॅनवरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

झळकविलेल्या पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकल्याने राठोड नेमके कुणासोबत आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राठोड हे गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या आणि मतदारसंघात आगमनानिमित्त समर्थकांनी लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो नाही.

दिव्ंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहे. जिल्हा परिषदेतील माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच राठोड यांच्या समर्थकांनी हे बॅनर जिल्हाभर लावले आहे. त्यामुळे संजय राठोड हे शिवसेनेत की शिंदे गटात याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.