संजय राऊत यांच्या खासदारकीलाच सोमय्या देणार आव्हान

0
423

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्रात नुकत्याच राज्यसभा निवडणुका संपल्या आहेत. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत धनंजय महाडिकांचा विजय खेचून आणला. जोरदार शक्तीप्रदर्शनही झालं. येत्या २० तारखेला पार पडणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी हा रिझल्ट निर्णायक मानला जातोय. मात्र त्याआधीच किरीट सोमय्यांनी पुन्हा दिल्लीचा रस्ता धरला आहे. यावेळी त्यांनी राऊत यांची राज्यसभेवरील खासदारकी रद्द करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. दरम्यान, अपक्ष आमदारांची उघडपणे नावे जाहिर केल्याने महाआघाडीतही राऊत यांच्याबद्दल आता नाराजीचा सूर उमटला आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. सरकारमधील अन्य पक्षांचा प्रत्येक उमेदवार निवडून आला. मात्र, शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडल्याने हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. संजय राऊत यांना देखील कट-टू-कट मतांनी विजयी झाले. मात्र, आता किरीट सोमय्या ही उमेदवारीच रद्द करण्याची मागणी करणार आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीचा रस्ता धरलाय.

मी आज दिल्लीला जाणार आहे .संजय राऊत यांच्या धमक्या देणार्‍या आमदारांची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची उमेदवारीच रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय.

“संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड केली आणि त्यांनी आपला विश्वासघात केल्याचं म्हटलं. शिवसेनेला दिलेल्या आश्वासनानुसार या मतं दिली नाहीत, असं राऊत म्हणाले. हे कायद्याच्या विरोधात असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. यासाठी कायदेशीर मार्गाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं सोमय्यांनी स्पष्ट केलंय. यासाठी ते दिल्लीला रवाना होत आहेत.