संजय राऊत यांचा मॅटिनी शो बंद झालाय…- मुख्यमंंत्र्यांची बोचरी टीका

0
213

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत हे दखल घेण्यासारखे नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या खासदारांवर ईडीचा दबाव असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला. संजय राऊतांचा सकाळचा शो बंद झाला आहे. ते आता दखल घेण्यासारखे नाहीत. दुसरं कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. मात्र, संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.