संजय राऊत यांचा घरचा मार्ग मोकळा; शिवसेना आणि महाराष्ट्रतही मोठा जल्लोष

0
314

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर अॅार्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. सायंकाळी सात वाजता ते जेलमधून बाहेर येतील. बाहेर येताच सिध्दीविनायक मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील आणि थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी माथा टेकण्यासाठी जातील. दरम्यान, पूर्ण मुंबईसह अन्य शहरांत संजय राऊत यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स झळकत असून कोण आला रे कोणा आला शिवसेनेचा वाघ आला…ना झुके है ना झुकेंगे अशा घोषणांचे बॅनर्स लागले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने विरोध केला होता. यावर पुन्हा दुपारी सुनावणी झाली. यावेळी ईडीची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, ईडीकडून पुन्हा राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील केली होती यावर आता उद्या यावर सुनावणी होणार आहे. मात्र राऊतांच्या जामिलास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आता उद्या या प्रकरणी काय ट्विस्ट येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.