संजय राऊत नमाज पठणाला कुठे जातात हे शोधावे लागेल; खासदार अनिल बोंडेची जहरी टीका

0
89

अमरावती, दि. 27 (पीसीबी) : “सातत्याने हिंदू संस्थान व मंदिरांबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. नागपूर येथील कोराडी संस्थान 100 वर्षांपूर्वीचे संस्थान आहे. अनेकांचे ते कुलदैवत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात याची प्रगती झाली. 800 विद्यार्थ्यांना एक रुपयात शिक्षण देत आहेत. या संस्थानाबाबत बोलते पोपट संजय राऊत, नाना पटोले, अनिल देशमुख हे कोराडी माते संदर्भात बोलत आहेत. यांची माताही तीच आहे” असं खासदार अनिल बोंडे म्हणाले. “काँग्रेस नेत्यांनी नागपूर मध्ये किती जमिनी लाटल्या? सतीश चतुर्वेदी यांनी किती हेक्टर जमीन लाटली? इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पैसे जमा करण्याचे काम ते करत आहेत” अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

“मुस्लिम संस्थांची यादी माझ्याकडे आहे. त्या शैक्षणिक संस्था असून आरक्षण लागू होत नाही, तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याउलट जे अन्नछत्र चालवतात, अशा कोराडी मातेच्या संस्थेवर आरोप केले जात आहेत” असं अनिल बोंडे म्हणाले. “हे संस्थान कुठल्याही कुटुंबाचे नाही. बावनकुळे हे तिथे अध्यक्ष आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्षांची निवड केली जाते. याआधी दुसरे अध्यक्ष होते. परिणामी या संस्थेविरोधात खोटे आरोप करून बदनामी केली जातं आहे” असं अनिल बोंडे म्हणाले.

“संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही. त्यांना धर्मवीर कधीच आठवणार नाही. त्यांना औरंगजेब व टिपू सुलतान आठवेल. त्यांचे धर्मपरिवर्तन झाले आहे. फक्त ते नमाज पठणाला कुठे जातात, हे शोधावे लागेल” अशा शब्दात राऊतांवर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केलेल्या वक्व्यावरही अनिल बोंडे बोलले.

“अमरावतीमध्ये निधड्या छातीने नितेश राणे येतील. सर्व हिंदू बांधव उपस्थित राहतील. मुस्लिम समाजाने नसत्या भानगडीत पडू नये. ईदच्या मिरवणुकीत हिंदू समाजातील लोक स्वागतासाठी उभे होते. उलट गणेशोत्सव मिरवणुकीत दगडफेक केली” असं अनिल बोंडे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. त्यावरही अनिल बोंडे बोलले. “त्या महिलेचे दु:ख जाणून घेतले पाहिजे. समुपदेशन केले पाहिजे. तिला कोणी पाठवले होते का? मंत्रालय प्रशासनाने याचा शोध घेतला पाहिजे” असं अनिल बोंडे म्हणाले.