संगणक अभियंत्‍यांची 92 लाखांची फसवणूक

0
101

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका संगणक अभियंत्याची 91 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

याबाबत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या एका 46 वर्षीय संगणक अभियंत्‍याने शुक्रवारी (दि. ७) सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मार्च 2024 ते 3 जून 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून सोशल मीडियावर गुंतवणुकीबाबत जाहिरात दिली. तसेच गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने प्ले स्टोअर वर एक लिंक पाठवून सीएपीएल मार्केट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर्स खरेदी करण्यास सांगून त्याचा मोठा मोबदला मिळत असल्याचे अँप वर दाखवले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम व परतावा परत न देता 91 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली