श्वानाला अमानुषपणे मारहाण; एकावर गुन्हा दाखल

0
338

काळेवाडी, दि. ६ (पीसीबी): तापकीर नगर काळेवाडी येथे एका व्यक्तीने श्वानाला अमानुषपणे मारहाण केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

दीपक भागवत (रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक याने मोठमोठे दगड व सिमेंटच्या विटांनी तापकीर नगर येथील शेरू नावाच्या श्वानाला फेकून मारल्या. त्यातील एक वीट शेरू या श्वानाच्या पोटात लागली आणि तो जखमी झाला. दीपक याने परिसरात राहणाऱ्या इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.