श्र्वानाला हुसकावल्याने तरुणास मारहाण

0
483

वाकड, दि. २८ (पीसीबी) -घरासमोर विष्ठा करत असल्याने श्वानाला महिलेने हुसकावले. या कारणावरून श्वानाच्या मालकाने महिलेला शिवीगाळ केली. तसेच महिलेच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना 19 जानेवारी रोजी सकाळी अशोकनगर, वाकड गावठाण येथे घडली.

ओमकार किरण वाघमारे (वय 20, रा. अशोकनगर, वाकड गावठाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप कृष्णा वाघमारे (वय 55, रा. अशोकनगर, वाकड गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे यांच्या घरासमोर आरोपी दिलीप यांचा श्वान येऊन विष्ठा करीत असे. त्यामुळे वाघमारे यांच्या आईने त्या श्वानाला हुसकावले. त्यावरून दिलीप याने वाघमारे यांच्या आईला शिवीगाळ केली. त्यामुळे शिवीगाळ करू नका असे समजावण्यासाठी वाघमारे आरोपीच्या घरासमोर गेले. त्यावरून दिलीप याने फिर्यादी वाघमारे यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.