श्र्वानाला अमानुषपणे मारहाण

0
12

रावेत, दि. 03 (पीसीबी) : सोसायटीच्या आवारात राहणाऱ्या भटक्या श्र्वानाला अमानुषपणे मारणार केल्याची घटना रावेत येथे उघडकीस आली. ही घटना 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. आनंद प्रकाश परदेशी (वय 39, रा. रावेत) यांनी याप्रकरणी तीन डिसेंबर रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत मधील ट्रॉपीका सोसायटी येथे सोसायटीच्या आवारात भटके श्वान फिरतात त्यांची देखभाल फिर्यादी आनंद परदेशी करतात. यातील एका भटक्या श्वानाला अज्ञात व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये श्वान गंभीर जखमी होऊन अपंग झाला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.