श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मुक्ताबाई अंतर्धान दिन साजरा

0
139

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी आदिशक्ती मुक्ताबाई यांचे अंतर्धान दिना निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील वीणा मंडपात ह.भ.प. माऊली महाराज करंजीकर यांनी कीर्तन सेवा हरिनाम गजरात रुजू केली. आळंदीत सर्व संतांच्या पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र साजरी करण्याचे अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, वारकरी सेवा संघ तसेच श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या वतीने संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. सर्व संतांच्या पुण्यतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हरिनाम गजरात विविध कार्यक्रमांनी उपक्रम राबविण्यात आला. गेल्या दहा वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वारकरी सेवा संघाच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सर्व संतांच्या पुण्यतिथी साजरा करण्याचा संकल्प राजाभाऊ रंधवे ( चोपदार ) यांनी व्यक्त करीत कार्य सुरू झाले. त्या प्रमाणे गेले दहा वर्षापासून सर्व संतांच्या पुण्यतिथी हरिनाम गजरात साजरी केली जाते. याही पुढे सर्व दिंडी चालक, मालक यांचे सहकार्याने प्रत्येक गावामध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथी या सर्व समाजाने साजरा कराव्यात त्याची प्रेरणा तरुण पिढी घेतल्या शिवाय राहणार नाही. याच अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्ताई अंतर्धान दिना निमित्त मुक्ताईंचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे. ह.भ. प. माऊली महाराज करंजीकर यांच्या कीर्तन झाले.त्या नंतर पुष्पवृष्टी हरिनाम गजरात झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे कीर्तनकारांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे गुरुजन साधक, विद्यार्थी राजाभाऊ चोपदार, संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, भाविक, नागरिक, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. भाविक भक्तांना श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे सर्व नियोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त माधवी निगडे यांनी केले.