ठाणे, दि. ५ (पीसीबी) – सध्या राज्यात आषाढी वारीचे वारे वाहत आहेत. दिंडीतून अनेक वारकरी पायी पंढपुराकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, यंदाच्या महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला असून याचे आमंत्रण त्यांच्या घरी पोहोच झाले आहे. ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारले. यानंतर अनेक राजकीय सत्तानाट्य घडली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यंदा ठाकरेंना हा मिळणार का अशी चर्चाही मध्यंतरी रंगली होती. मात्र यंदा हा मान एकनाथ शिंदेंना मिळाला आहे.