दि . १८ . पीसीबी – पिंपरी, निगडीतील प्राचीन आणि पवित्र श्री दुर्गेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंग आणि नंदी यांचे जिर्णोद्धार 1999 मध्ये होऊन मंदिराला नवी जीवनशक्ती प्राप्त झाली आहे. दररोज 4 ते 5 हजार भाविक श्रद्धाभावाने दर्शनासाठी येत असून, परिसरातील नागरिकांमध्ये दुर्गेश्वराच्या भक्तीचा एक जिव्हाळ्याचा स्नेह तयार झाला आहे.
श्री दुर्गेश्वर चारिटेबल ट्रस्ट प्राधिकरणच्या नेतृत्वाखाली परिसरात वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, दुर्गाष्ठमी, मकर संक्रांती, श्रावणी सोमवार, गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी दीपोत्सव, भागवत सप्ताह तसेच रक्तदान शिबीर आणि जेष्ठ नागरिकांसाठी योगासन वर्ग अशा अनेक कार्यक्रमांनी स्थानिक समुदायाला एकत्र आणले आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी जेष्ठ नागरिक विकास संघाकडून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सहभागी होणारे वारकरी मंदिराला भेट देऊन धार्मिकतेची परंपरा जपत आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष श्री गोविंद गायकवाड हे अध्यात्मिक मार्गदर्शक तसेच समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक एकात्मता आणि आध्यात्मिक विकास यांना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांनी सदैव “सेवा हेच खरे धन आहे” हा संदेश दिला आहे.
ट्रस्टचे सचिव आनंदा साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टच्या सदस्यांनी सतत प्रयत्न करून परिसरातील लोकांमध्ये एकजूट, धार्मिक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी वाढवली आहे. अध्यक्ष गोविंद गायकवाड, सचिव आनंदा साळुंखे, सहसचिव बाळासाहेब धुमाळ, खजिनदार विकास सोनवणे, उपाध्यक्ष अमित गावडे आणि कैलास जायगुडे यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख दिनेश लिंगावत यांनी वेळोवेळी मंदिराला निस्वार्थी भावाने मंदिराची सेवा करतात श्री दुर्गेश्वर चारिटेबल ट्रस्टच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीची अमरता कायम राहिली असून सामाजिक बांधिलकी दृढ झाली आहे.
“आध्यात्म म्हणजे अंतर्मुख होऊन आत्मशुद्धीचा प्रवास, तर समाजसेवा म्हणजे त्या शुद्ध आत्म्याने इतरांच्या जीवनात उजेड फुलवणे. जीवनातील खरी संपत्ती सेवा आणि श्रद्धेच्या मार्गावरच आहे” असे आनंद साळुंखे यांनी सांगितले.