श्री जैन विद्या प्रसारक मंडळ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर

0
8

दि . ९ ( पीसीबी ) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड या संस्थेने सन 1927 पासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवले आहे. हेच कार्य पुढे नेण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड आणि श्रीमान शांतीलालजी भीकचंदजी कटारिया आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर रसिकलाल एम धारिवाल इंटरनॅशनल स्कुल (CBSE) वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड आणि संघवी केशरी कॉलेज व रसिकलाल एम धारिवाल फार्मसी कॉलेज फिनॉलेक्स कंपनी समोर, चिंचवड स्टेशन या दोन ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरामध्ये मध्ये 17 पेक्षा जास्त रक्तपेढी संस्था आणि 1755 विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. सदरील रक्तदान शिबिराची विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुप चे अत्यंत दुर्मिळ असे रक्तदाते जे की फक्त महाराष्ट्रामध्ये 16 आणि जगभरात 400 आहेत त्यापैकी एका रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद आहे.
रक्तदान शिबिरासाठी आलेल्या महिलांची मोफत हिमोग्राम तपासणी देखील संबंधित ब्लड बँकांच्या वतीने करण्यात आली महिलांच्या आरोग्य विषयी जागृती करण्यात आली आणि महिलाच्या रक्तामधील कमी प्रमाणातील हिमोग्लोबिन विषयी महिलांचे कौन्सिलिंग करून त्यांच्या आहाराविषयी व आरोग्य विषयी जनजागृती निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेचे विश्वस्त श्री सतीश जी चोपडा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.
या रक्तदान शिबिराला श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी धारिवाल, कार्याध्यक्ष श्री शांतीलालजी लुंकड , ऑनरारी जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.
श्री.राजेंद्रकुमारजी मुथा , खजिनदार श्री प्रकाशजी चोपडा, जॉईंट सेक्रेटरी प्रा. श्री अनिलकुमारजी कांकरिया, जॉईंट सेक्रेटरी श्री.राजेशकुमारजी साकला, ट्रस्टी श्री सतिशजी चोपडा, श्री प्रवीणशेठ लुंकड, श्री वालचंदजी संचेती, श्री प्रकाशजी बंब, आणि सर्व ट्रस्टी तसेच रुबी हॉल क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर मुजुमदार मॅडम रक्ताचे नाते तर्फे श्री रामभाऊजी बांगड विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आणि लोकजागृतीबाबत श्री जैन विद्या प्रसारक मंडळातील विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सोशल मीडिया रिलीज व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून जनजागृती करून रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळविला.
आजचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम केले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आणि श्री शांतीलाल जी भिकचंदजी कटारिया – आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदात्यास अनोखी भेटवस्तू देण्यात आली.