श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी रानिल विक्रमसिंघे

0
692

कोलंबो, दि. २० (पीसीबी) श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात संघर्ष होता. रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा पराभव केला आहे.

रानिल विक्रमसिंघे बहुमतांनी विजयी-
श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यवाहक राष्ट्रपतीपदाचीजबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये रानिल विक्रमसिंघे यांनी 134 मतांनी विजय मिळवला आहे. 225 खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मतदान केलं. विजयासाठी उमेदवाराला 113 हून अधिक मतं मिळवणं आवश्यक होतं. या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे 134 मतं मिळवत बहुमत मिळवत राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.