श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक

0
522

विदेश,दि.०५(पीसीबी) – श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह तो ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होता. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. टीमशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. 31 वर्षीय दानुष्का गुणथिलकाला अटक करुन रविवारी पहाटेच्या सुमारास सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. 2 नोव्हेंबरला दानुष्का गुणथिलकाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली दानुष्का गुणथिलकाला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीम त्याच्याशिवाय मायेदशी रवाना झाली आहे. श्रीलंकन टीमशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलय.

श्रीलंकन टीमच वर्ल्ड कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. शनिवारी श्रीलंकेचा इंग्लंडने पराभव केला. दानुष्का गुणथिलकाला पहिल्या राऊंडमध्ये नामीबिया विरुद्ध खेळला. त्यावेळी तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. श्रीलंकन टीमचा नामीबियाकडून पराभव होऊनही ते सुपर 12 साठी पात्र ठरले होते.

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर या अटकेची माहिती दिलीय. त्यांनी नाव घेतलेलं नाही. फक्त श्रीलंकन नागरिकाला अटक केली, एवढाच उल्लेख आहे. रोझ बे येथे श्रीलंकन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. दानुष्का गुणथिलकाची ऑनलाइन डेटिंग App वरुन महिलेबरोबर ओळख झाली होती. 2 नोव्हेंबर 2022 बुधवारी संध्याकाळी त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

तपासाचा भाग म्हणून विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी रोझ बे येथील पत्त्यावर जाऊन गुन्हा घडला, त्या ठिकाणाची पाहणी केली. सिडनीच्या ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला अटक केली. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अजून यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. दानुष्का गुणथिलका 3 आठवड्यापूर्वीच दुखापत झाली होती. त्याच्याजागी एशेन बनडाराचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता.